शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराची शिकार, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रानडुकराची शिकार करून त्याची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. सदर घटना १६ जानेवारी रोजी घडली.रानडुकराची शिकार करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार आरमोरी- गडचिरोली मार्गावरील पोर्ला येथील वडधा फाट्यावर ट्रॅक्टर अडवून तपासणी केली. त्यामध्ये ...

ठळक मुद्देट्रॅक्टरमध्ये टाकून वाहतूक : पोर्ला येथील वडधा फाट्यावर रचला सापळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रानडुकराची शिकार करून त्याची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. सदर घटना १६ जानेवारी रोजी घडली.रानडुकराची शिकार करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार आरमोरी- गडचिरोली मार्गावरील पोर्ला येथील वडधा फाट्यावर ट्रॅक्टर अडवून तपासणी केली. त्यामध्ये एक मृत रानडुकर आढळून आला. या प्रकरणी अवतारसिंग कतारसिंग डांगी रा. इंजेवारी, गोविंदसिंग हुकूमसिंग डांगी रा. इंजेवारी, नरेश अशोक तोंडरे रा. देऊळगाव यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, आरोपींनी सांगितले की अवतारसिंग याने साखरा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ५ मध्ये १५ जानेवारी रोजी रानडुकराची शिकार करण्यासाठी सायंकाळी बारूदीचे गोळे ठेवले होते. १६ जानेवारी रोजी सकाळी गोविंदसिंग डांगी हा दुचाकीने तेथे गेला. त्या ठिकाणी एक रानडुकर बारूद गोळा खाऊन मृतावस्थेत आढळला. गोविंदसिंग याने देऊळगाव येथील नरेश तोंडरे याला ट्रॅक्टर आणण्यास सांगितले. त्यानंतर डुकराला ट्रॅक्टरमध्ये मांडून ते गडचिरोलीकडे आणले जात होते. दरम्यान पोर्लाजवळ सापळा रचून पकडण्यात आले.या अगोदर या आरोपींनी काही वन्यजीव अशाच प्रकारे मारले असल्याची शक्यता निर्माण झाली असल्याने त्या दृष्टीने वन विभागाचे कर्मचारी आरोपींची चौकशी करीत आहेत. सदर कारवाई सहायक वनरक्षक डी. पी. चौडीकर, पोर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी ए. बी. साळवे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक विजय कंकालवार, व्ही. बी. राजूरकर, एस. जे. ताजणे, वनरक्षक आर. व्ही. आसलवार, नितीन तुम्पल्लीवार, नितीन गडपायले, विलास समर्थ, व्ही. बी. पावडे, अनंत मेश्राम, नरोटे, सरकार आदींनी केली.