शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रांगीत प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:49 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक शाळेच्या क्रिडांगणावर मंगळवारपासून तीनदिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळेतील एकूण १ हजार ४६ खेळाडूंना क्रीडाकौशल्य प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.

ठळक मुद्दे४३ आश्रमशाळांचा सहभाग : १ हजार ४६ खेळाडू दाखविणार कौशल्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक शाळेच्या क्रिडांगणावर मंगळवारपासून तीनदिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळेतील एकूण १ हजार ४६ खेळाडूंना क्रीडाकौशल्य प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते २५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह तर विशेष अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक शशिकांत साळवे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, प्रकाश काटेंगे, शाळा समितीचे अध्यक्ष जांबुवंत पेंदाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष रांगी येथे भेट देऊन संमेलनाच्या तयारीचा आढावा नुकताच घेतला. क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २५ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ४३ आश्रमशाळेतील खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हॅन्ड बॉल या सांघिक खेळासह धावणे, लांबउडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी वैयक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.२७ ला पारितोषिक वितरणप्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता विजेते खेळाडू व संघाला पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित राहणार आहेत. संमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश पिल्लारे यांच्यासह २०० कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.