शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रामय्यापेठाची रेणुका बनणार कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:57 IST

आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

ठळक मुद्देओबीसी प्रवर्गातून राज्यातून १७ वी : गरिबीचा सामना करून मिळविले यश

प्रशांत ठेपाले।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.रेणुकाचे प्राथमिक शिक्षण गावातच रामय्यापेठा येथे पूर्ण झाले. पाचवी ते दहावीपर्यंत ती राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे शिकली. रेणुकाची हुशारी, परिश्रम करण्याची जिद्द ओळखून राणी दुर्गावती विद्यालयाचे प्राचार्य गजानन लोनबले व वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जमीर हकीम यांनी तिला पदवीच्या शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पदवीचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी या गोष्टी न झेपणाऱ्या होत्या. त्यामुळे रेणुकाच्या आईवडिलांनी तिला पुढील शिक्षण देण्यास नकार दिला. मात्र तिच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी प्राचार्य लोनबले व अब्दुल हकीम यांनी उचलण्याचे आश्वासन दिले.पदवीच्या शिक्षणासाठी तिला वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात पाठविण्यात आले. तिच्या राहण्याची सोय प्राचार्य लोनबले यांनी स्वत:च्या घरी केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला जळगाव येथे पाठविण्यात आले. जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा.येजुवेंद्र महाजन यांनी मदत केली. जळगाव येथे रेणुकाने स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी केली. त्यात तिला यश मिळाले असून तिने कर सहायकाची परीक्षा उत्तीर्ण केली. रेणुकाचे वडील शेतकरी असून आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत रेणुकाने यश संपादन केले. तिचे हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द महत्त्वाची - रेणुकास्पर्धा परीक्षेची तयारी करताना गरीब विद्यार्थ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरीबी व अभ्यास या दोन बाबींशी त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र यावर मात करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एमपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकाऱ्याची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रेणुका निकुरे हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.