लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड परिसरासह संपूर्ण आरमोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार पावसाने झोडपणे सुरू केले आहे. पावसामुळे पाटणवाडा येथील परसराम कुमरे यांच्या घराची अंशत: पडझड झाली. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून समाधानकारक पाऊस होत असल्याने वैरागड भागातील शेतकरी सुखावला.वैरागड परिसरासह आरमोरी तालुक्याच्या अनेक भागात आद्रा नक्षत्रात १ ते ३ जुलैदरम्यान पाऊस बरसला. या पावसामुळे वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत पाटणवाडा येथील परसराम कुमरे यांचे घर कोसळले. याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा होती, त्यांनी यापूर्वी धानाचे पºहे टाकले. सद्य:स्थितीत अनेक शेतातील धान पºहे रोवणी योग्य झाले असून काही शेतकºयांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रोवणीच्या कामास सुरूवात केली आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मे व जून महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. मात्र आता सरी बरसत असल्याने परिस्थिती सुधारली.
वैरागड भागात बरसला मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:25 IST
वैरागड परिसरासह संपूर्ण आरमोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार पावसाने झोडपणे सुरू केले आहे. पावसामुळे पाटणवाडा येथील परसराम कुमरे यांच्या घराची अंशत: पडझड झाली. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून समाधानकारक पाऊस होत असल्याने वैरागड भागातील शेतकरी सुखावला.
वैरागड भागात बरसला मुसळधार पाऊस
ठळक मुद्देशेतकरी सुखावला : पाटणवाडात घराची पडझड