शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:12 IST

२७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत तारांबळ : सखल भागातील वस्त्यांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. दुपारी ३ वाजतानंतर अचानक आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाजारपेठेते विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भामरागड व आष्टी येथील नदी पुलावरील पूर सायंकाळच्या सुमारास ओसरला होता. त्यानंतर भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. आष्टी येथील वैनगंगा नदीचा पूर ओसरल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक पूर्वत सुरू झाली. मात्र सोमवारी पुन्हा पाऊस बरसल्याने पुलावर पाणी साचले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. परिणामी अशा शेतातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहेत. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुन्हा सोमवारी पाऊस झाल्यामुळे रोवणी लांबणीवर पडण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले.