कार्यकर्ते विखुरले : तीन विधानसभा क्षेत्रात ५७ उमेदवारांचे नामांकन दाखलगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात ५७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत आरमोरी विधानसभा क्षेत्रात २१, अहेरी विधानसभा क्षेत्रात १४ तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सगुणा पेंटारामा तलांडी, भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. देवराव मादगुजी होळी, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातर्फे भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम, शिवसेनेतर्फे केसरी पाटील उसेंडी, अपक्ष म्हणून विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी, बसपातर्फे विलास कोडाप, मनसेतर्फे रंजीता विलास कोडाप या प्रमुख उमेदवारांसह बसपातर्फे शिशूपाल बिरसू तुलावी, भाजपातर्फे शंभूविधी देवीदास गेडाम, अपक्ष म्हणून भुपेश कुळमेथे, गोगपातर्फे दिवाकर पेंदाम, भारिप बमसंतर्फे कुसुम अलाम, पुरूषोत्तम गायकवाड, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षातर्फे डॉ. देवीदास मडावी, अपक्ष म्हणून हरिशचंद्र मंगाम, वासुदेव शेडमाके, सुनंदा आतला, जयश्री वेळगा, नारायण जांभुळे, संजय हिचामी, गोपाल उईके, डॉ. मोरेश्वर रामचंद्र किन्नाके आदी २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार आनंदराव गंगाराम गेडाम, शिवसेनेतर्फे डॉ. रामकृष्ण मडावी, भाजपतर्फे क्रिष्णा गजबे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नारायण वटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय भाकपकडून हिरालाल येरमे, अपक्ष जयसिंग चंदेल, बसपा नामदेव कुमरे, भाजप कुवर लोकेशचंद्र सयाम, अपक्ष म्हणून मनेश्वर मारोती मडावी, योगेश नामदेव गोनाडे, नारायण देवाजी जांभुळे, निरांजनी चंदेल, जयदेव मानकर, रामसुराम विश्वास काटेंगे, कोमल गोविंदा ताराम बसपा, अशोक मोतीराम कोकोडे अपक्ष, अॅड. प्रताबशाह दाजीबा मडावी, नंदकुमार नाजुकराव नरोटे यांनी उमेवारी अर्ज दाखल केले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अपक्ष म्हणून विद्यमान आमदार दीपक आत्राम, भाजप-नाविसतर्फे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम, भाराकाँतर्फे मुक्तेश्वर गावडे गुरूजी आदी प्रमुख उमेदवारांसह संतोष मल्लाजी आत्राम, रामशाह मडावी, पेंदा मुक्ता भुमय्या, कैलाश गणपत कोरेत, राणी रूख्मिणीदेवी सत्यवान आत्राम, रामेश्वर जगन्नाथराव आत्राम, रघुनाथ गजानन तलांडे, प्रभूदास आत्राम यांनी बसपाकडून तर पेंटारामा तलांडी यांनी अपक्ष म्हणून व दिनेश ईश्वरशाह मडावी यांनी मनसेकडून आपले उमेदवारी अर्ज येथे दाखल केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अखेरच्या दिवशी नामांकनाचा पाऊस; जोरदार शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: September 27, 2014 23:14 IST