शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:02 IST

मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली/मानापूर/देलनवाडी : मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.मंगळवारी एटापल्ली तालुक्यात एकूण ११.२ मिमी पाऊस बरसला. हाती येणाऱ्या हरभरा पिकाला या पावसाचा प्रचंड फटका बसला. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेक ठिकाणचे खांब वाकले, तसेच काही ठिकाणच्या वीज तारा लोंबकळल्या. यामुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. गट्टा भागात १८.२ मिमी, कसनसूर १६.२ मिमी, एटापल्ली शहरात ६.४ मिमी व जारावंडी भागात ४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. सदर अवकाळी पावसामुळे कोणत्या गावात किती नुकसान झाले, याचा आकडा संबंधित यंत्रणेकडून अद्यापही मिळालेला नाही.१२ व १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने मानापूर, देलनवाडी, भाकरोंडी परिसरातील रब्बी पिकांना प्रचंड फटका बसला. सोमवारी रात्री १० वाजतापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे विटा व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला व रब्बी हंगामातील इतर पिकांचे नुकसान झाले.