शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडसह जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झाला नाही. मात्र रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून मेघगर्जनेसह भामरागड, धानोरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.भामरागड शहरासह तालुक्यात पावसाच्या दमदार सरी बरसल्या. धानोरा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. गडचिरोली ...

ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : धानोरातही विजेच्या कडकडाटासह सरी बरसल्या, विसर्जन मिरवणुकीवर विरजण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झाला नाही. मात्र रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून मेघगर्जनेसह भामरागड, धानोरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.भामरागड शहरासह तालुक्यात पावसाच्या दमदार सरी बरसल्या. धानोरा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. गडचिरोली शहर व तालुक्यात सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. विशेष म्हणजे, यावेळी विजेचा कडकडाट व वादळ सुटले होते. दसºयानंतर रविवारला गडचिरोली, आरमोरी शहरासह अनेक ठिकाणी दुर्गा व शारदा विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. मात्र अचानक पाऊस झाल्याने भाविकांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन झाले. २९ सप्टेंबरलाही गडचिरोली जिल्ह्यात एकूण १०.३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे.बाजारात उडाली तारांबळगडचिरोली शहराच्या आठवडी बाजारात रविवारला ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. दरम्यान सायंकाळी ४.५० वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस झाला. त्यामुळे ग्राहकांचीही काही वेळ तारांबळ उडाली. पावसाचा अंदाज नसल्याने एकानेही छत्री आणली नव्हती. त्यामुळे शेडचा आडोसा घेतला.