शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पटवारी भवनात शिरले पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

पटवारी भवन परिसरातील पाण्याचा याेग्य प्रकारे निचरा हाेत नसल्याची तक्रार येथील महिलांनी १९ जुलै राेजी नगर परिषदेकडे केली हाेती. ...

पटवारी भवन परिसरातील पाण्याचा याेग्य प्रकारे निचरा हाेत नसल्याची तक्रार येथील महिलांनी १९ जुलै राेजी नगर परिषदेकडे केली हाेती. परंतु महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. जुलै महिन्यात अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे येथे पाणी तुंबून राहात हाेते. परंतु लाेकांच्या घरात पाणी शिरत नव्हते. परंतु राष्ट्रीय महामार्गालगतची नाली पूर्णत: तुंबल्याने रविवारी आलेल्या जाेरदार पावसामुळे पाणी पटवारी भवनात शिरले. याशिवाय परिसरातील अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. आरमाेरी मार्गालगत बांधकाम केल्याने नालीत मलबा शिरला आहे. त्यामुळे नाली तुंबली व ही समस्या निर्माण झाली, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या वाॅर्डातील महिलांनी सदर समस्येची तक्रार नगर परिषदेकडे केली हाेती. परंतु काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पाण्याचा याेग्य निचरा व्हावा, यासाठी उपाययाेजना करावी, अन्यथा नगर परिषदेवर माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.