शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्य जलसंवर्धन कागदावरच

By admin | Updated: June 14, 2014 02:19 IST

नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला पर्जन्य संवर्धनाची सुविधा

गडचिरोली : नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला पर्जन्य संवर्धनाची सुविधा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) असणे आवश्यक असतांनाही जिल्ह्यातील एकाही इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण भारतात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. या कालावधीत नदी, नाले ओसंडून वाहतात. मात्र सदर पाणी साठवून त्याचा भविष्यात वापर करण्याची कोणतीही योजना नसल्याने पावसाचे कोट्यवधी लिटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्याचबरोबर या कालावधीत पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित व आर्थिक हानीही होते. उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. माठभर पाण्यासाठी मैल-दोन मैल पायपीट करावी लागते. हा अनुभव दरवर्षीच येत आहे. एवढेच नाही तर दिवसेंदिवस पावसाळ्यात पुराची तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यासाठी राज्य शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना सुरू केली असून ही योजना शासकीय इमारती व गृह निर्माण संस्थांना राबवायची आहे. राज्य शासनाने १४ फेब्रुवारी २००२ रोजी परिपत्रक काढले आहे. सुरूवातीला वॉटर हार्वेस्टिंगची नागरिकांना सवय लागावी, यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान दिले जात होते. १० टक्के हिस्सा ग्रामस्थांना भरावा लागत होता. मात्र अनुदान देऊनही ही योजना पुढे सरकली नाही. या शासन निर्णयानुसार नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला व गृह निर्माण संस्थांकडून बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे आवश्यक करण्यात आले होते. शासन निर्णयानंतर १२ वर्षाच्या कालावधीत जिल्हाभरात हजारो नवीन इमारती बांधण्यात आल्या. मात्र एकाही ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नाही. महत्वाचे म्हणजे शासकीय इमारतीमध्येच ही सुविधा निर्माण करण्यात आली नाही. तर खाजगी नागरिक या पद्धतीचा अवलंब कसे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७०० मीमी पाऊस पडतो. राज्याच्या इतर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमान सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर नदी, नाल्यांचे प्रमाणही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. शेती व उद्योगांची संख्या कमी असल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी होतो. त्यामुळे उन्हाळ्यातही फारशी पाणीटंचाई जिल्ह्यात सध्यास्थितीत तरी जाणवत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसह नागरिकही पर्जन्य जलसंचय योजनेबद्दल फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)