शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST

जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यात निकृष्ट कामे : अधिकारी सुस्त, कंत्राटदार मस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होऊन सध्या चिखल पसरला आहे.जिल्हा परिषदेने मागील वर्षी जवळपास १०० कोटी रूपयांचे ३०-५४ या लेखा शीर्षांतर्गत कामाचे नियोजन केले होते. यातील अनेक कामे जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहेत. एटापल्ली तालुक्यात या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गापासून आतमध्ये काही कामे करण्यात आली. पण कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अल्पावधीतच रस्ते उखडून चिखलमय झाले आहेत. परंतु या प्रकाराकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कंत्राटदारांचे फावले आहे.जिमलगट्टा येथे पसरली घाणजिमलगट्टा येथील मुख्य मार्गावर सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे संपूर्ण मार्गावर घाण पसरली असल्यामुळे आवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत ये-जा करणाºया व रस्त्यांवर फिरणाºया लोकांना रस्त्यावरील घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शासनाने चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा निधी येत असून त्याचा योग्य वापर न होऊन स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावावा, पुन्हा मुख्य मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.