शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पावसाची उसंत, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:21 IST

रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

ठळक मुद्देनद्यांचे पाणी ओसरले : भामरागड, एटापल्ली तालुक्यातील सर्वच मार्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मंगळवारी मात्र पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र कुरखेडा तालुक्यातील खोब्रागडी नदीला मंगळवारी पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलावर सोमवारी दुपारनंतर पाणी चढले होते. रात्री पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत झाली. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने याही मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच सुरू झाली. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, देवदा, हालेवारा मार्ग सुरू झाले. डुम्मी नाल्यावरील पूर ओसरल्याने जवेली, मरपल्ली, वासामुंडी मार्ग सुरू झाला आहे. धानोरा तालुक्यातीलही सर्वच मार्ग सुरू झाले आहेत.गडचिरोलीनंतर सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला होता. भामरागडजवळील पर्लकोटा नदी पुलावर रविवारी मध्यरात्री पाणी चढले. त्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता पुलावरील पाणी ओसरले. मात्र पुन्हा रात्री ९ वाजता पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. रात्रभरातून पाणी कमी झाल्याने मंगळवारी पुलावरील पाणी ओसरले. पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ, लाकडे, जमा झाली होती. त्यामुळे पूर ओसरला असला तरी वाहतूक होणे अशक्य होते. तहसीलदार कैलास अंडील यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील मलबा व लाकडे काढली. जवळपास सकाळी १० वाजतानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मातीच्या घरांना व नुकतेच रोवणे झालेल्या धान पिकाला बसला आहे. घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे. मात्र नेमक्या किती घरांचे नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा प्राप्त होऊ शकला नाही. आठ दिवसांपूर्वी रोवणीला सुरूवात झाली होती. अशातच सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली. रोवलेले धान वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.व्यंकटेश सिडाम बेपत्ताचप्राणहिता नदीत अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली घाटावरून व्यंकटेश सिडाम हा युवक वाहून गेला. बचाव पथकाने सोमवारी व मंगळवारी दिवसभर सदर युवकाचा शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोध कार्यात अडचणीत येत आहेत. बुधवारी सुध्दा बचाव पथकातर्फे त्याचा शोध घेतला जाणार आहे.खोब्रागडी नदीला पूरमंगळवारी कुरखेडा, कोरची तालुक्यात दमदार पाऊस झाला. कुरखेडात १०० मिमी तर कोरची तालुक्यात ६८ मिमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. कातलवाडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचले होते. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. नदी लगत असलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीही वाहून गेले. मंगळवारी दुपारनंतर पुलावरील पाणी ओसरले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पं.स. उपसभापती मनोज दुनेदार यांनी परिस्थितीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी दुनेदार यांनी केली आहे.पोटगावात घर कोसळलेदेसाईगंज : तालुक्यातील पोटगाव येंथील गणेश वाढगुरे यांचे विटांचे घर कोसळले. त्यामुळे सुरज वाढगुरे हा लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. घराचा पंचनामा करण्यात आला आहे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.