शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

शहीद जवानाच्या मातेचे प्रश्न; पालकमंत्री स्तब्ध

By admin | Updated: April 5, 2015 01:44 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने ...

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने तब्बल १० दिवसानंतर सांत्वनासाठी पोहोचणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना खडेबोल सुनावले. चकमकीच्या घटनेच्या वेळी तत्काळ मदत मिळाली असती तर माझा मुलगा वाचला असता, असे त्यांनी सांगितले. २२ मार्चला मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना दोगे आत्राम व स्वरूप अमृतकर हे जवान शहीद झाले होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्ह्यातील खासदार, आमदार आले नाहीत. त्यानंतरही एकही लोकप्रतिनिधी शहिदांच्या घरापर्यंत पोहोचला नाही. राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याबाबतचा सरकारप्रती प्रचंड रोष राजधानीतूनच इंग्रजी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला. त्यानंतर सुस्तावलेल्या सरकारमधील गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम शुक्रवारी रात्री उशिरा शहीद जवान स्वरूप अमृतकरच्या घरी पोहोचले. त्यावेळी शहीद अमृतकरच्या आई कल्पना अमृतकर यांनी आपली सारी आपबिती पालकमंत्र्यांना सुनावली. माझा मुलगा चार तास तडफडत होता. नक्षलवाद्याशी लढणाऱ्या माझ्या मुलाच्या अंगावर बुलेटफ्रुप जॉकेट नव्हते. सायंकाळ झाली म्हणून हेलिकॉप्टर उडविता येत नाही, असे सांगून मदत देण्यात आली नाही. हेलिकॉप्टर मिळाले असते तर माझा मुलगा वाचला असता, इतर वेळी हवे तसे हेलिकॉप्टर सायंकाळी (सूर्यास्तानंतर) उडविले जाते. मात्र या घटनेत तसे झाले नाही. हेलिकॉप्टरसोबत वैद्यकीय अधिकारी द्यायला हवा, तसेच पोलिसांच्या रुग्णालयात रक्ताची व्यवस्था असायला हवी, असेही सुचविले. आपला पोरगा हा उत्तम दर्जाचा खेळाडू होता. त्याला शौर्यपदक शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही कल्पना अमृतकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्र्यांनी हे सारे मुकपणे ऐकूण घेतले. यावेळी त्यांच्या समावेत गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, अनिल करपे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, अभिजीत कोरडे, संतोष पड्यालवार, श्रीनिवास नागडीवार, राजू गव्हारे, पुष्पा लाडवे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)