शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी, तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या ...

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी, तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.

मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे.

शहरातील पक्के अतिक्रमण कायमच

आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गांवर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे.

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.

मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी, तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा कायम

धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात किमीचे अंतर असून, या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. सदर मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सदर मार्गावर दोन नाले असून, त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते. अशा वेळी गावात एखादी आकस्मिक घटना घडल्यास बोधनखेडावासीयांना काहीच पर्याय नसतो. गंभीर रुग्णांना औषधोपचारासाठी पावसाळ्यात मार्ग नसल्याने तालुका व जिल्हा स्थळावर नेता येत नाही.

कमलापूर परिसरात वीजचोरी वाढली

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे अनेक वर्षांपासून काही नागरिक घरी विद्युत मीटर न लावता वीजचोरी सर्रास करीत आहेत, परंतु या प्रकाराकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावातील मुख्य चौकात काही व्यापारी दिवसाढवळ्या विजेची चोरी करतात, परंतु विद्युत कर्मचारी या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र, याचा आर्थिक फटका गावातील अन्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. सर्रास वीजचोरी केली असताना, या व्यावसायिकांवर महावितरण कंपनीतर्फे का कारवाई केली जात नाही, असा सवाल गावातील नागरिकांनी केला आहे. कमलापूर हा दुर्गम भाग असल्याने, अधिकाऱ्यांमार्फत वीज जोडणी अथवा कनेक्शनची तपासणी होत नसल्याने सदर प्रकार वाढत आहेत.

वाघोली परिसरात इंटरनेटची समस्या

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून बीएसएनएल कंपनी व इतर खासगी कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होत आहे, तसेच इंटरनेटची अत्यंत कमी स्पीड असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. भेंडाळा परिसरात १५ गावांचा समावेश आहे. येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ग्राहकांकडे बीएसएनएलची सेवा उपलब्ध आहे, परंतु सदर सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. इतर खासगी कंपन्या फोर-जी सेवा देत असतानाही बीएसएनएल थ्री-जी सेवा देत आहे. त्यातही इंटरनेट स्पीड अत्यंत संथ आहे. अनेकदा कव्हरेज, तसेच इंटरनेट विस्कळीत होतो. सातत्याने मागणी करूनही बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नाही.

कान्होलीत नाल्यांचा अभाव

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली गावातील काही वॉर्डांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. गावात रोगराई पसरण्याची शक्यता असतानाही उपाययोजना करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नाल्यातील गाळाचा उपसा झाला नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. कच्च्या स्वरूपात असलेल्या नाल्यातील गाळ उपसा न झाल्याने नाल्या गाळाने तुडुंब भरून आहेत. पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. गावातील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचा अपवाद वगळता, साधारणत: सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियाेजन शून्यतेमुळे गावातील रस्ते व नाल्यांची व्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. परिणामी, नागरिक त्रस्त झाले आहेत.

विजेच्या तारांपासून नागरिकांना धोका

आरमोरी : येथील पालोरामार्गे जाणाऱ्या टॉवर परिसरातील रस्त्याच्या कडेला विद्युत तारा लोंबकळत आहेत. आरमोरी शहरात बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विद्युत खांब कमी उंचीचे असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने तारा ताणाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेणे महावितरण कंपनीचे काम आहे, परंतु याकडे महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. या सदर लोंबकळणाऱ्या तारांपासून दुर्घटना घडू शकते. रस्त्याने आवागमन करताना विजेचा झटका बसताे.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने, शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा

गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते, शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाहीत

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

चपराळा येथे सोईसुविधा पुरवा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, या ठिकाणी सोईसुविधांचा अभाव असल्याने, भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.

हूक टाकून विजेची चोरी सुरूच

वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. पशुधन घटल्याने दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.