शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती आसरअल्लीचे धान खरेदी केंद्र दोन दिवसातच बंद

By admin | Updated: December 31, 2015 01:37 IST

तेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने ...

तालुक्यासाठी दिला एकच ग्रेडर : शेतकऱ्यांना रात्र काढावी लागते थंडीतश्रीकांत सुगरवार आसरअल्लीतेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने प्रचंड अडचणीत आले असून या प्रश्नाला घेऊन ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी जाहीर केला आहे. आसरअल्ली येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. फक्त दोनच दिवस धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी करण्यासाठी सिरोंचा तालुक्याला फक्त एकच ग्रेडर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हे खरेदी केंद्र बंद पडून आहे. केंद्र सुरू होताच परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हजारो क्विंटल धान मार्केटमध्ये आणले व केंद्र बंद झाल्यावर आता शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत धान पोत्यांची रखवाली करीत बाजार ठिकाणीच रात्र काढावी लागत आहे. अंकिसा येथील खरेदी केंद्रही बंदअंकिसा येथे गोदामाअभावी अजूनपर्यंत हमीभाव धान खरेद केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. आसरअल्ली व अंकिसा येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना सांगितले की, यंदा उतारा घटला असून खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ५ जानेवारीपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास आसरअल्ली, अंकिसा परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेतील, अशी माहिती गजानन कलाक्षपवार, नागीरेड्डी गुडीमेटला, पापय्या पाले, वेंकटेश्वर इनगंटी, अब्दुल गणी, शेख वाहिद यांनी दिली.यंदा उतारा घटलागेल्या वर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पन्न झाले होते. परंतु यावर्षी एका एकरात केवळ ८ क्विंटल धान झाले आहे. नापिकी व कमी उत्पादन यातच शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याच्या दारात आपला माल विकासाठी जावे लागत आहे. खासगी व्यापारी/सावकार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करीत असून काही व्यापाऱ्यांनी तर शेतकऱ्यांना कर्जाऊ दिलेली रक्कमही मालाच्या विक्रीतूनच कापण्याचा सपाटा लावला आहे.