शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा केला, मात्र रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास नदी पात्रातून रेतीचे अवैधरित्या खणन करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआसरअल्ली येथील प्रकार । महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली (गोलागुड्डम माल) येथील पुलाच्या बांधकामासाठी अवैधरित्या रेती नेणाऱ्या ट्रॅक्टरचा तलाठ्यांनी पंचनामा केला. मात्र संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली नाही. हा प्रकार अलिकडेच उघडकीस आला आहे.सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास नदी पात्रातून रेतीचे अवैधरित्या खणन करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली येथे गेल्या काही महिन्यांपासून पुलाच्या कामासाठी सिमेंट काँक्रीटला लागणारी रेती अवैधरित्या आणली जात आहे. शेकडो ब्रास रेती अवैध मार्गाने या कामात वापरली जात असल्याचे दिसून येते. संबंधित साजाच्या तलाठी प्रविण डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन १६ ब्रास रेतीचा पंचनामा केला. मात्र संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली नाही. याचा फायदा पुलाचे बांधकाम करणारी कंपनी घेत आहे. या भागात दररोज टिपरने नदी पात्रातून रेतीची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकार थांबविण्यासाठी चौकशी करून धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडालासिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली ते पातागुड्डम महामार्गाच्या कामासाठी आसरअल्ली वन परिक्षेत्राच्या हद्दितील रेती, गिट्टी, दगडाची अवैधरित्या तस्करी करून ते वापरण्यात आले. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला. मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपनीने शासनाला चूना लावला.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी