शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

तलावात पक्के अतिक्रमण

By admin | Updated: December 15, 2014 22:55 IST

जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमात अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक सदन नागरिक आयती जागा

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : घर बांधून विकण्याचा गोरखधंदा वाढलागडचिरोली : जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमात अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक सदन नागरिक आयती जागा मिळत असल्याच्या हव्याशावरून तलावातील जागेवर अतिक्रमण करीत आहेत. अनेकांनी तलावात पक्के घर बांधले आहेत. तर काही नागरिक तयार झालेले घर मोठ्या किंमतीने विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.शहरात गोकुलनगरलगत असलेला तलाव पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या हद्दीत येते. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या पर्यावरण व परिस्थितीच्या निधीतून गेल्या वर्षभरापासून या तलावाच्या सौदर्यीकरणाचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत कासवगतीने सुरू आहे. गोकुलनगरलगत या तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी एक मोठी मागणी शहरातील जनतेनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर केला. मात्र या तलावावर देखभाल व व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य योग्यरितीने पार पाडल्या जात नसल्याने येत्या काही वर्षात अतिक्रमणामुळे सदर तलाव संपूर्ण गिळंकृत होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी शहरवासीयांसाठी फिरण्याकरीता प्रशस्त जागा शिल्लक राहणार नाही. सिंचाई विभागाच्या अधिनस्त सदर तलाव असल्यामुळे या तलावाच्या देखभाल व व्यवस्थापनाकडे नगर पालिका प्रशासनाचे काही नियंत्रण नाही. सद्य:स्थितीत गोकुलनगरलगतच्या तलावात १०० हून अधिक नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधल्याचे दिसून येते. यामुळे तलावातील पाण्याचे पात्र कमी झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)