शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:07 IST

वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. परिणामी युवक व सामान्य नागरिकांना रोजगारासाठी कधी छत्तीसगड तर कधी तेलंगणा राज्यात जावे लागते. असे असताना हा मुद्दा कोणत्याच निवडणुकांमध्ये फारसा चर्चेचा विषय ठरत नाही.जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७६ टक्के भागावर जंगल आहे. सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र हे सर्व प्रकल्प वन कायद्याच्या कचाट्यात अडकले. मिळालेली परवानगी वन कायद्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे एखाद्या होतकरू तरूणाने आधुनिक शेती करायची ठरवले तरी त्याच्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे समोरचे संपूर्ण नियोजन फेल ठरते. थोडीफार रोजगार शेतीच्या माध्यमातून निर्माण होतो, मात्र सिंचनाअभावी येथील शेती बेभरवशाची बनली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व सागाचा दर्जा अतिशय चांगला आहे. बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूंना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर चांगली मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करता येणे शक्य आहे. मात्र बांबूपासून मोठ्या प्रमाणात वस्तू तयार होतील व हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. परिणामी लाखमोलाचा बांबू जंगलातच सडत आहे. तेलंगणातील तस्करांची येथील सागवानावर नेहमीच नजर असते. गोदावरी, प्राणहिता नदी पार करून सागवानाची चोरी केली जाते. त्यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. मात्र आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सागवानापासून चांगल्या वस्तू निर्माण होतील.स्थानिक स्तरावर जी संसाधने उपलब्ध आहेत, त्यानुसार रोजगार निर्मितीचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जंगल अधिक आहे. त्यमुळे जंगलावर आधारित उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात असे घडले नाही. परिणामी जंगलामुळेच आपला विकास रखडला, अशी चुकीची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.- रामू मादेशी,सामाजिक कार्यकर्ते, आलापल्लीआजपर्यंतच्या राजकीय व्यक्तींनी रोजगार निर्मितीबाबतचे केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. मात्र प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाही. अजुनही येथील युवकांना रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्य गाठावे लागते. बांबू, सागवान लाकूड यांच्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करता येऊ शकेल, असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.- आकाश बोबाटे, बेरोजगार युवक, इंदिरानगर, गडचिरोली

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019