शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आरोग्यविषयक योजनांची जनजागृती

By admin | Updated: April 7, 2016 01:33 IST

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुरखेडाच्या वतीने महाआरोग्य अभियानांतर्गत कुरखेडा येथे शनिवारी आरोग्य विषयक

कुरखेडा येथे शिबिर : जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण, मातृत्व अनुदान व लसीकरणावर मार्गदर्शनकुरखेडा : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुरखेडाच्या वतीने महाआरोग्य अभियानांतर्गत कुरखेडा येथे शनिवारी आरोग्य विषयक योजनांच्या जनजागृतीबाबत शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून कुरखेडाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामले तर अध्यक्षस्थानी कढोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनोने उपस्थित होते. उद्घाटक म्हणून देऊळगाव केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम तसेच प्रमुख अतिथी म्हणून बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. साखरे, डॉ. ठलाल, डॉ. हुमने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मेश्राम यांनी आरोग्य विभागातील विविध सवलतीबाबतच्या योजना लोकांना समजावून सांगितल्या. जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम, मातृत्व अनुदान, मानव विकास, नियमित लसीकरण, क्षयरोग, हिवताप कार्यक्रम, कुष्ठरोग, हत्तीरोग, राजीव गांधी जीवनदायी कार्यक्रम आदींबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. ठलाल यांनी बालक व महिलांची आरोग्य तपासणीबाबत माहिती दिली. डॉ. हुमने यांनी सिकलसेल, प्रसूती आहार, सावित्रीबाई कन्या योजना आदींबाबत माहिती दिली. डॉ. सोनोने यांनी स्त्री- पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली. किशोर खरवडे व राहुल बडोले यांनी क्षयरोगाबाबत माहिती देऊन नागरिकांनी जागृत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन डॉ. दामले यांनी केले तर आभार बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमाला नर्सेस, आरोग्य सेविका, सेवक, कर्मचारी व कुरखेडा शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)