लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने १ जुलैपासून होणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष दिंडी काढण्यात येत आहे. वर्धा येथून निघालेली ही वृक्ष दिंडी चंद्रपुरातून चामोर्शीमार्गे गडचिरोलीत २६ जूनला पोहोचली. या वृक्ष दिंडीचे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पथनाट्य व एलईडी स्क्रिनद्वारे माहितीपट हे या वृक्ष दिंडीचे आकर्षण ठरले.येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातून निघालेली दिंडी इंदिरा गांधी चौकातून चामोर्शीमार्गे फिरत मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. त्यिेथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित वनाधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी वृक्षारोपणाबाबत शपथ घेतली. त्यानंतर सदर वृक्ष दिंडी आरमोरीमार्गे वडसाकडे निघाली.१ जुलैपासून सुरू होणाºया वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करून महाराष्टÑ हरीत करावा, असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ.शि.र.कुमारस्वामी यांनी दिंडीदरम्यान केले. याप्रसंगी आ.प्रा.अनिल सोले, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, एस.एल.बिलोलीकर, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मुक्ता टेकाडे, वसंत साबळे, वनपरिक्षेत्राधिकारी डी.व्ही.कैलुके, विजय कोडापे आदी उपस्थित होते.
वृक्ष दिंडीतून लागवडीबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:59 IST
राज्य शासनाच्या वतीने १ जुलैपासून होणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष दिंडी काढण्यात येत आहे. वर्धा येथून निघालेली ही वृक्ष दिंडी चंद्रपुरातून चामोर्शीमार्गे गडचिरोलीत २६ जूनला पोहोचली. या वृक्ष दिंडीचे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पथनाट्य व एलईडी स्क्रिनद्वारे माहितीपट हे या वृक्ष दिंडीचे आकर्षण ठरले.
वृक्ष दिंडीतून लागवडीबाबत जनजागृती
ठळक मुद्देगडचिरोलीत स्वागत : पथनाट्य, एलईडी स्क्रिन ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू