शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती

By admin | Updated: June 13, 2017 00:46 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विस्तारक योजनेंतर्गत कार्यक्रम आयोजित करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विस्तारक योजनेंतर्गत कार्यक्रम आयोजित करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आली. गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमाला भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालरवार, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंदलवार, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाकडून अनेक लोकहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य घटकातील नागरिकांना मिळाला पाहिजे. या उदात्त हेतूने पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त कार्यविस्तार योजना राबविली जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व विस्तारक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पक्षाचे ध्येय धोरण नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या, असेही ते म्हणाले. यावेळी विविध आघाड्यांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. देसाईगंज येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनाविषयी आढावा बैठक रविवारी संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि. प. सभापती नाना नाकाडे जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम, आळे रोशनी पारधी, खोब्रागडे, नगराध्यक्ष शालू दंडवते, पं. स. सभापती, उपसभापती, सदस्य तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना माध्यमातून भाडभिडी व विकासपल्ली येथे योजनांची जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, दिलीप चलाख, आशिष कोडापे, दिलीप देशमुख व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिरोंचा तालुक्यातील ग्रा. प. आरडा, राजन्नपल्ली, राजेश्वरपल्ली भाजपच्या वतीने विस्तारक अभियान राबविण्यात आले. गावातील प्रत्येक घराला भेट देउन केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आरडा गावाचे सरपंच रंगु बापु, डॉ. श्रीनिवास अनपर्ती, मनोज रंगुवार डॉ. बोडेंकि, किस्टय्या येर्रोल्ला, अशोक येतम, शकुंतला येतम कार्यकर्ते हजर होते.