शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती

By admin | Updated: October 30, 2014 22:52 IST

तालुक्यातील वसा येथे २९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडचिरोलीच्यावतीने जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.

गडचिरोली : तालुक्यातील वसा येथे २९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडचिरोलीच्यावतीने जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. वसा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या सप्ताहानिमित्त विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गतच जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर चमत्कारांचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तथा भ्रष्टाचार विरोध जनआंदोलन न्यासचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीचे कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, दलित मित्र नानाजी वाढई, बापूजी गेडाम, भाऊराव कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नानाजी वाढई यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामूदायीक प्रार्थनेचे महत्व पटवून दिले. पंडित पुडके यांनी ग्रामीण भागातील जनता अजूनही अंधश्रद्धेला बळी का पडते यावर आपले मत व्यक्त करून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक कसा करावा, याविषयी विविध दाखले दिले. डॉ. शिवनाथ कुंंभारे यांनी तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सर्व अध्यायांचा परामोश घेऊन विश्वातील मानवासाठी कशी फायद्याची आहे हे समाजावून सांगितले. विलास निंबोरकर यांनी बुवा, बाबा, हायफाय महाराज व दैवी शक्तीचा आव आणणारे चमत्काराच्या नावाखाली अज्ञानी, अशिक्षित लोकांना कसे फसवतात व आपण कसे फसत जातो याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम संचालन दहीकर तर आभार गोहणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी निशाने पाटील, भुसारी, जनार्धन धानोरकर यांच्यासह गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले.