शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मनाेरुग्णाची सहा महिन्यांनंतर झाली स्वकियांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून फिरत हाेते. उपपाेलीस स्टेशन ते गाव परिसरात त्यांचा वावर हाेता. ते मनाेरुग्ण असल्याचे गावातील लाेकांना माहीत हाेते. परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. आधीच नक्षलग्रस्त भाग असल्याने धाेका हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी त्यांच्या हालचालींवरून चाैकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली. तेव्हा बाबू भवर हे मनाेरुग्ण असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देव्यंकटापूर पाेलिसांचा पुढाकार : संशयास्पद हालचालींमुळे घेतले हाेते ताब्यात

लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : पाेलिसांचा कडक व कठाेर स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना  ते केवळ आपल्या आक्राळविक्राळ स्वभावाचेच प्रदर्शन करीत नाहीत तर अनेकदा सामाजिक बांधिलकीतूनही काम करतात. अशाच घटनेचा परिचय अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर पाेलिसांनी दिला. गावात व उपपाेलीस स्टेशन परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस करून स्वकियांशी भेट घडवून आणली. तब्बल ६ महिन्यांनंतर नांदेड जिल्ह्यातील कुटुंबीयांशी भेट झाल्याने मनाेरुग्ण भारावला.बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून फिरत हाेते. उपपाेलीस स्टेशन ते गाव परिसरात त्यांचा वावर हाेता. ते मनाेरुग्ण असल्याचे गावातील लाेकांना माहीत हाेते. परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. आधीच नक्षलग्रस्त भाग असल्याने धाेका हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी त्यांच्या हालचालींवरून चाैकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली. तेव्हा बाबू भवर हे मनाेरुग्ण असल्याचे दिसून आले. त्यांचे नाव, गाव व पत्त्याविषयी विचारपूस करून खात्री केली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षकांशी फाेनद्वारे संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून काकंडी गावचे पाेलीसपाटील महादेव व्यंकाेबा बागल यांच्याशी बाेलणी करून ओळख पटविली व नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळविला. मनाेरुग्ण इसमाचा भाचा नामदेव कदम (रा. तुपा, ता. जि. नांदेड) यांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी बाेलणी करण्यात आली. नामदेव कदम हे १८ मे राेजी व्यंकटापूर उपपाेलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तेव्हा दाेघांनीही एकमेकांना ओळखले. या भेटीने मामा व भाच्याला अत्यानंद झाला. पाेलिसांच्या मानवतेमुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुखरूप मिळाली, असे उद्गार नामदेव कदम यांनी काढत जिल्हा पाेलीस दलाचे आभार मानले.१२ वर्षांपासून हाेते भरकटलेमनाेरुग्ण व्यक्ती आज इथे तर उद्या तिथे, अशी गावाेगाव भटकत असते. अधिक दूर अंतर भरकटल्यास त्याचा गावाशी संपर्क येत नाही व ती व्यक्ती कायमची भरकटते. बाबू भवर हे मागील १२ वर्षांपासून मनाेरुग्ण असून, ६ महिन्यांपूर्वी ते घरातून निघून गेले हाेते, अशी माहिती भवर यांचे भाचे नामदेव कदम यांनी दिली. भ्रमणध्वनीवरच्या चाैकशीनुसार कदम यांनी व्यंकटापूर पाेलिसांकडे बाबू भवर यांचे छायाचित्र ऑनलाईन पाठविले. भवर यांची खात्री पटल्यानंतर त्यांना व्यंकटापूर येथून घेऊन जाण्यास सांगितले.

 

टॅग्स :Policeपोलिस