शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४९९ वनराई बंधाऱ्यातून प्राण्यांना पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : कुरखेडात सर्वाधिक १२७ बंधारातून सिंचन सुविधा; सिरोंचा तालुक्याने उद्दिष्ट गाठले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन १९८० च्या वनकायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. मात्र कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. कृषी विभागाच्या वतीने गतवर्षी जिल्हाभरात वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकूण ४९९ बंधारे पूर्ण करण्यात आले.रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो. याशिवाय वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व कृषी कर्मचाऱ्यांमार्फत कृषी योजना गावपातळीवर पोहोचविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वन्य व पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वनराई बंधारे बांधण्यात आले. एका कृषी सहाय्यकाला पाच वनराई बंधारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४४ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. एकाला पाच प्रमाणे एकूण ७२० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात ४९९ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले. उर्वरित २२१ बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहेत.४८६ बोड्या पूर्ण; कामावर १६.१५ लाखांचा खर्चमागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला जवळपास ५०० बोड्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण ३ हजार ४८७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ४०६ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले व ३ हजार २७६ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी ८९२ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ४८६ बोड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. २०१९-२० मध्ये बोड्या निर्मितीवर १६.१५ लाखांचा खर्च झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प