शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 01:48 IST

राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरिता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून

अर्थसंकल्पात घोषणा : मार्गाच्या कामाला गती मिळणार गडचिरोली : राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरिता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापण्याकरिता ५० कोटी रूपयांच्या भाग भांडवलासाठी निधी देण्याबरोबरच गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासह अन्य दोन रेल्वे मार्गासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात शनिवारी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे वडसा-गडचिरोली या ५० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रवास आता सुकर होणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या रेल्वे मार्गाच्या कामासाठी १८० कोटी रूपये देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या भागीदारीतील १५० कोटी रूपयांत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाला किमान ५० कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी मागील महिन्यात रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचेही काम मार्गी लावले. त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे. मागील ३० वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. भाजप सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली.