माेहझरी येथील प्रभाकर भाेयर यांच्या शेतात ट्रान्सफाॅर्मर आहे. पावसाळ्यात वीज दुरुस्तीची कामे करताना धाेका आहे. धाेकादायक ट्रान्सफाॅर्मर हटविण्याची गरज आहे. याशिवाय गावातील लाइन सिंगल फेज असल्यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठा केला जाताे, तसेच वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. माेहझरी हे गाव जंगलाला लागून आहे. परिसरात वाघांचा वावर आहे. अशा स्थितीत रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिक अंगणात झाेपू शकत नाही. अनेकदा कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पंखे व कूलर सिंगल फेजमुळे कार्यान्वित हाेत नाही. दाेन्ही समस्यांमुळे गावातील नागरिकांना माेठ्या प्रमाणावर त्रास हाेत आहे. कालिदास लांबाडे यांच्या घरापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत ४ ते ५ वाढीव खांब लावून येथे पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे. विजेसंदर्भातील समस्या लवकर साेडवावी, अशी मागणी लाेमेश लांबाडे यांनी विद्युत अभियंता वंजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माेहझरी येथे थ्री-फेज लाइन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST