ग्राम संवाद सरपंच संघाची बैठक गडचिराेली येथील विश्रामगृहात साेमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतीच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रमाेद भगत, राज्य कार्यकारिणी सदस्य नंदा कुलसंगे, सरचिटणीस नीलेश पुलगमकर, विदर्भ अध्यक्ष दिगांबर धानाेरकर, सल्लागार कविता भगत, जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार तसेच गडचिराेली जिल्ह्यातील सरपंच उपस्थित हाेते.
ग्रामविकास विभागाने २३ जून २०२१ रोजी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. महाराष्ट्रातील अनेक लहान ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी फार कमी मिळतो. त्यातूनच संगणक परिचालकांचे मानधन द्यावे लागते तसेच इतर कामे करावी लागतात. त्यामधूनच जर स्ट्रिट लाईटचे व पाणीपुरवठ्याचे वीज बिल भरले तर गावाच्या विकासासाठी निधीच शिल्लक राहत नाही. काही गावांना पाच लाखांचा निधी मिळाला आहे, तर नऊ लाख रुपयांचे वीज बिल प्राप्त झाले आहे. त्यामुळे वीज बिल भरायचे कसे, असा प्रश्न या मंथन बैठकीत अनेक सरपंचांनी उपस्थित केला.
बाॅक्स...
सरपंच विम्याच्या प्रतीक्षेत
कोरोना महामारीमध्ये प्रत्येक गावातील सरपंचांनी आपले काम अगदी चोखपणे बजावले. त्यामुळे सर्व सरपंचांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करून ५० लाखांचा विमा कवच द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. काेविड महामारीच्या कालावधीत अनेक सरपंचांनी आपल्या जिवाची पर्वा न करता तपासणी, औषधाेपचार व लसीकरण, आदींबाबत जनजागृती केली. त्यामुळे विमा लागू करणे आवश्यक आहे.
===Photopath===
270621\5554img-20210627-wa0137.jpg
===Caption===
ग्राम संवाद बैठकीत बोलतांना पदाधिकारी