शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात नियमित वीज पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 03:40 IST

तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. अनेकदा वीज गूल होत

देसाईगंज : तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. अनेकदा वीज गूल होत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्यात नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुक्यात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. वीज पंपाद्वारे धानाला पाणी पुरवठा करताना अडचणी येत असल्याने धान पीकही धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४० हजार रूपयांची आर्थिक मदत करावी, अनुसूचित जाती, जमाती संवर्गाप्रमाणे इतर मागासवर्गीयांनाही विविध सवलींचा लाभ द्यावा, संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे अनुसूचित जाती, जमातीप्रमाणेच इतर मागासवर्गीयांनाही गॅस वितरित करावे, विविध योजनांचा लाभ इतर मागासवर्गीयांना द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या मागण्या मान्य न झाल्यास देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, विनायक घारगावे, रवींद्र कुथे, ठुमदेव कुकूडकार, गजू नाईक, रमेश गरमडे, आत्माराम दुधकुवर, सुरेंद्र दोनाडकर, रमेश कोहळे, नामदेव प्रधान, मोहन शेंडे, होमराज हारगुळे, दिगांबर मेश्राम, राजेंद्र दिघोरे, गोपीचंद सिंहगडे व बहुसंख्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)