शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयाला सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:43 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सदर विद्यालयातील समस्यांकडे आठवडाभरापूर्वीच ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते हे विशेष.

ठळक मुद्देखासदारांची मागणी : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मनुष्यबळ विकासमंत्र्यांकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सदर विद्यालयातील समस्यांकडे आठवडाभरापूर्वीच ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते हे विशेष.या विद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत आहे. नवोदय विद्यालयाच्या इमारतीला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे जंगली व पाळीव प्राणी यांच्यापासून विद्यार्थ्यांना धोका आहे. शाळेची जुनी इमारत जीर्णावस्थेत पोहोचली आहे. शिक्षकांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने गावात खोली करून राहावे लागत आहे. शिक्षकांची निवासस्थाने विद्यालयाच्या आवारातच असती तर विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहण्यास मदत झाली असती.घोट येथे एखाद्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर तो शिक्षक दुसऱ्या ठिकाणी बदलीसाठी प्रयत्न करतो. मात्र कारण नसेल तर अशा शिक्षकांची घोटवरून इतर ठिकाणी बदलू करू नये. विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. शुध्द पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. घोट येथील नवोदय विद्यालयातून अनेक किर्तीवंत विद्यार्थी घडले आहेत. ही परंपरा याही पुढे सुरू ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे.