शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांना बँंक सेवा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:04 IST

व्यावसायिक दृष्टीकोन सांभाळतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, मजूर व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी बँक सेवा देण्यावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.

ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : रामगड शाखेच्या इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : व्यावसायिक दृष्टीकोन सांभाळतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, मजूर व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी बँक सेवा देण्यावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, संचालक खेमनाथ डोंगरवार, खुशाल वाघरे, ब. सो. ऐलावार, हि. जे. वालदे, जा. तू. खेडकर, भैय्याजी वाढई, हरिश्चंद्र डोंगरवार, नागीलवार, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, रामगडच्या सरपंच वच्छलाबाई केरामी, चांगदेव फाये आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आ.गजबे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हाभर दुर्गम भागात बँकेच्या शाखा कार्यान्वित केल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे, असे मार्गदर्शन केले. संचालन व प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर तर आभार खेमनाथ डोंगरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, अविनाश मुर्वतकर, रोषण डोंगरवार, महाजन यांनी सहकार्य केले.सहकारी बँकेकडे १३०० कोटींच्या ठेवीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे १ हजार ३०० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास बँकेवर वाढत चालला आहे. संपूर्ण संचालक मंडळ व कर्मचाºयांनी केलेल्या प्रगतीचे फळ दिसून येत आहेत. सर्वांगिण विकास करण्याकरिता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व ग्रामीण भागात बँकेच्या शाखा असतानाही जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातील इतर बँकांच्या तुलनेत अधिक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.रामगड व परिसरातील नागरिकांना बँकेने सुसज्ज इमारत बांधून दिली आहे. बँक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन खेमनाथ डोंगरवार यांनी केले.