आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक जि.प. हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील २४ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा शाल, साडी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, मुलचेराच्या पं.स. सभापती येमुलवार, जि.प. सदस्य नीता साखरे, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ज्ञ डॉ. योगीता सानप, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल म्हणाले, महिलांना त्यांना हवा असलेला सन्मान अद्यापही पूर्णपणे मिळालेला नाही. महिलांना त्यांचा दर्जा व सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. उमेद ही महिलांची मोठी संघटना असून यात ५० हजार महिला सक्रिय आहेत. महिला या पुरूषांपेक्षा अधिक विश्वासू व्यक्ती आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के पेक्षा अधिक महिला बचतगटांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. महिला विविध क्षेत्रात प्रगती साधत आहेत. महिलांनी आणखी प्रगती साधावी, असे आवाहन गोयल यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.आर. लांबतुरे, संचालन देसाईगंजच्या सीडीपीओ निर्मला कुचीक, एटापल्लीचे सीडीपीओ बढे यांनी केले तर आभार मुलचेराचे सीडीपीओ हटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ सहायक दिलीप गेडाम, जगदीश मेश्राम यांच्यासह जि.प. च्या महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस कार्यक्रमाला हजर होत्या.जिल्हाभरातील या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा झाला सत्कारसदर कार्यक्रमात १२ तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मिळून एकूण २४ महिला कार्यकर्त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, साडी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील नगरी अंगनवाडी केंद्राच्या सेविका कमल बानबले, मदतनीस दुशीला बांबोळे, कसारीच्या सेविका सविता बुद्धे, कोढाळाच्या मदतनीस गीता तरवटकर, वनखीच्या सेविका रत्नमाला शेंडी, मदतनीस दीपा राऊत, रामाळाच्या सेविका सरिता देवतळे, कुरूडच्या मदतनीस चंद्रभागा कोमलवार, धुसानटोलाच्या सेविका कल्पना हुर्रा, मदतनीस माया हुर्रा, गोठणगावच्या सेविका मंजूळा पत्रे, पुराडाच्या मदतनीस शेवंता नागोसे, सोहलेटोलाच्या सेविका अनुरथा लाडे व हितापाडीच्या मदतनीस सविता कुंजाम, रेगेंवाहीच्या सेविका जयमाला आत्राम, अंबेलाच्या मदतनीस मंथना उईके, तोडसाच्या सेविका सुमन चालूरकर, डुम्मेच्या मदतनीस गिरजा चुनारकर, नवेगावच्या सेविका मंगला मोहुर्ले, रायगट्टाच्या मदतनीस छाया तलांडी, कंबालपेठाच्या सेविका नागोबाई मडावी, सिरोंचाच्या मदतनीस नागलता पोचम, मल्लमपोडुरच्या सेविका करुणा धुर्वे, भामरागडच्या मदतनीस समिता मेश्राम यांचा समावेश आहे.अस्मिता योजनेचा प्रारंभराज्य शासनाने यावर्षीपासून संपूर्ण महाराष्टÑात अस्मिता योजना सुरू केली. या योजनेचे अनावरण जिल्हा पातळीवर सदर कार्यक्रमात करण्यात आले. या योजनेअंतर्गत ११ ते १९ वयोगटातील जि.प. शाळेतील मुलींना आठ पॅडचे एक पॉकेट पाच रूपये किंमतीत सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना २४० मीमी पॅडचे पॉकेट २४ रूपये तर २८० मीमी पॅडचे एक पॉकेट २९ रूपये किंमतीला मिळणार आहे. सदर योजना जि.प. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. महिला बचतगटासाठी अस्मिता मोबाईल अॅप कार्यान्वित केले आहे.कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळीवर मार्गदर्शनजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी सदर कार्यक्रमात कौंटुंबिक हिंसाचार, समुपदेशन व हुंडाबळी याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी कौंटुंबिक हिंसाचार व हुंडाबळीला बळी पडू नये, कायद्याचा आधार घेऊन अन्यायाला वाचा फोडावी, असे सांगितले.योगीता सानप यांनी महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध उद्योग उभारून स्वत:ची व कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या २४ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:38 IST
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक जि.प. हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील २४ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा शाल, साडी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट काम करणाऱ्या २४ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव
ठळक मुद्देजागतिक महिला दिनी सन्मान : महिलांनी आणखी प्रगती साधण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे आवाहन