देसाईगंज : एफडीसीएमच्या कामात तालुक्यातील तीन गावातील नागरिकांनी अडथळा आणल्याची तक्रार एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या कारवाईच्या निषेधार्थ तालुक्यातील डोंगरगाव, चिखली, मोहटोला येथील संतप्त नागरिकांनी शनिवारी देसाईगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. दरम्यान आ. क्रिष्णा गजबे यांनी मध्यस्ती करून एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून याविषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. वडसा वन विभागाने डोंगरगाव, चिखली, मोहटोला, शिरपूर येथील वनक्षेत्र एफडीसीएमला दिले आहे. दाट जंगल असल्याने ग्रामस्थांनी जंगलतोडीस एफडीसीएमला प्रखर विरोध केला. यानंतर एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी सरपंच, पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले. गावातील वनव्यवस्थापन समितीने यासंदर्भात वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले आहे. उपवनसंरक्षकांनीही हे काम थांबविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ग्रामस्थांची सभा झाली.
एफडीसीएमच्या विरोधात ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
By admin | Updated: March 6, 2016 01:05 IST