मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश : वृक्ष लागवडीचे आवाहनचंद्रपूर : पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, कारण पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व चंद्रपूर वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.एस. इंगळे, वन प्रशासन विकास व्यवस्थापक अशोक कवीटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.संजय ठाकरे म्हणाले, इंधन, पेट्रोल, डिझल, कोळसा यांच्या वापरामुळे कॉर्बनडाय आक्साईड मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा भारतात चवथ्या क्रमांकावर प्रदूषित जिल्हा म्हणून गणला गेला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित होवून लढा देण्याची गज आहे. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी.एस. इंगळे म्हणाले, जंगलातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तापमान वाढीमुळे समुद्राजवळील शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे जंगलाचे संगोपण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन संचालक अशोक कविटकर, वकील संघाचे अध्यक्ष पी.एस. सपाटे यांनीही वन विभागाशी संबंधित कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१, गिरीश अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश ४ एन.आर. नाईकवाडे, नागपूरे, विभागीय वन अधिकारी वाघाडे, आदी मंचावर उपस्थित होते. वन अधिकारी तलमले यांनी प्रास्ताविक केले. संचालन वनपाल गजपुरे तर आभार अॅड. महेंद्र असरेट यांनी मानले. यशस्वीतेसाठी तलमले, हिवरे, टी.एम. फुल्लुके, एम.एम. जनबंधु, एल. एम. उपरे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
पर्यावरणाचे रक्षण करणे आज काळाची गरज
By admin | Updated: June 16, 2016 01:38 IST