शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव, अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 19:18 IST

गडचिरोली : विदर्भ किंवा मराठवाड्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांचे ‘लोड’ फारसे नाही. पण मुंबई-पुण्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. त्यामुळे त्या भागात दोन नवीन कारागृहांचे प्रस्ताव शासनाकडे दिले असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. गडचिरोली येथील खुल्या कारागृहाचे निरीक्षण केल्यानंतर ते ‘लोकमत’शी ...

गडचिरोली : विदर्भ किंवा मराठवाड्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांचे ‘लोड’ फारसे नाही. पण मुंबई-पुण्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. त्यामुळे त्या भागात दोन नवीन कारागृहांचे प्रस्ताव शासनाकडे दिले असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. गडचिरोली येथील खुल्या कारागृहाचे निरीक्षण केल्यानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत सुरू झालेल्या खुल्या कारागृहाला मंगळवारी प्रथमच अपर पोलीस महासंचालकांनी भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी.एस.आडे, निरीक्षक बी.सी.निमगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी डॉ.उपाध्याय यांनी सांगितले की, राज्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांची संख्या सोडता दुसरी कोणतीही समस्या नाही. कच्च्या कैद्यांच्या पेशीसाठी सर्व कारागृहांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. पण न्यायालयांच्या सूचनेनुसार त्याचा वापर केला जातो. सद्यस्थितीत २० ते २५ टक्के कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने पेशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण घेणाऱ्या कैद्यांची संख्या वाढलीकारागृहांमध्ये राहून मुक्त विद्यापीठांच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाºया कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी त्यांना गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. याशिवाय आता कारागृह म्हणजे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिले नाही तर विविध व्यावसायिक प्रशिक्षण व कामांमधून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शेतीकाम, सुतारकाम, विणकाम, लाँड्री, पेंटींग अशी विविध व्यावसायिक कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत.