शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सीटी स्कॅनचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात

By admin | Updated: June 13, 2017 00:41 IST

थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंदस्थितीत असल्याने या सेवेअभावी जिल्हाभरातील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात एकाही ठिकाणी शासकीय यंत्रणेमार्फत सुविधा नाही : गरीब, गरजू रुग्णांना गाठावे लागते चंद्रपूर, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंदस्थितीत असल्याने या सेवेअभावी जिल्हाभरातील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासगी सीटीस्कॅन केंद्रात जाऊन महागडे शुल्क भरण्याची कुवत नसलेल्या शेकडो रुग्णांना सीटीस्कॅन करण्यासाठी चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नव्या सीटीस्कॅन मशीनचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य संचालकाकडे धूळखात पडला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. याशिवाय चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, आष्टी, एटापल्ली, अहेरी येथेही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयात सीटीस्कॅन सेवेचा अभाव आहे. त्यामुळे गडचिरोली येथे शासकीयस्तरावर एकमेव ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन काढण्यासाठी जिल्हाभरातील रुग्णांची गर्दी होत होती. मात्र येथीलही सीटीस्कॅन सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही मोजक्या खासगी रुग्णालयात सीटीस्कॅनची सुविधा आहे. मात्र शुल्क भरून शकणारे रुग्णच या ठिकाणी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. बीपीएलधारक, गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या रुग्णास सीटीस्कॅन काढावयाचा असल्यास त्याला चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठावे लागते. परिणामी अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची यासारख्या दूरवरून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर प्रवास खर्चाचा भूर्दंड बसतो. त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयी तत्काळ सीटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांनाही सीटीस्कॅन सेवेसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी अजूनही सुस्तगेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध नाही. यासंदर्भात अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार माहिती दिली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाबाबत शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा करण्यास कमी पडले आहेत. लोकप्रतिनिधींचा शासनदरबारी फारसा प्रभाव पडत नसल्यानेच जिल्ह्यात आरोग्याची समस्या बिकट झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे. अनेक शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनातर्फे देण्यात आलेल्या सीटीस्कॅन मशीनला दहा वर्षांचा कालावधी उलटला. सदर मशीनची मुदत संपल्याने ही मशीन बंद पडली. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सीटीस्कॅन मशीन बंद आहे. राज्याच्या आरोग्य संचालकांकडे नवी सीटीस्कॅन मशीन उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनामार्फत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शासनाने अद्यापही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी नवी सीटीस्कॅन मशीन पाठविली नाही. यासंदर्भात शासनाकडे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. प्रमादे खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली