लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तसेच लांबलेल्या खरीप हंगामामुळे धानपिकावर परिणाम झाला असून यंदा धानपिकाच्या उत्पादनात घट येणार, अशी शक्यता आहे. प्रतिकूल वातावरणामुळे सध्या वैरागड परिसरासह जिल्हाभरातील धानपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कीटकनाशकाची फवारणी सुरू आहे.धानपिकावर प्रत्येक हंगामात गादमाशी, तुळतुळे, लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असतो. कडाकरपा रोगाचाही प्रादुर्भाव धानाची रोवणी झाल्यानंतर ८ ते १५ दिवसानंतर होतो. मात्र यंदा इतर रोगापेक्षा खोडकिडा या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने हिरवेगार धानपीक आता पिवळे पडू लागले आहे. रोवणी झाल्यानंतर काही दिवसातच या रोगाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होते. या रोगावर क्लोरपायरीफॉसची फवारणी करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे
धानपिकांवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:12 IST
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तसेच लांबलेल्या खरीप हंगामामुळे धानपिकावर परिणाम झाला असून यंदा धानपिकाच्या उत्पादनात घट येणार, अशी शक्यता आहे.
धानपिकांवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव
ठळक मुद्देफवारणीला वेग : रोवणी लांबल्याने उत्पादन घटणार