लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेर येथे नुकतीच घडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य परिठ, धोबी, वरठी सेवा संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने निषेध करण्यात आला असून कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्यातील समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.न. प. चे माजी सभापती विजय गोरडवार यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी धोबी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दयाराम मेश्राम, जिल्हा सचिव मोरेश्वर मानपल्लीवार, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष संगीता गडपायले, मंगला केळझरकर, युवक धोबी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर गडपायले, विजय कृपाकर, विलास केळझरकर, भाऊराव मानपल्लीवार, दामोधर यम्पल्लीवार, रमेश गड्डमवार, प्रवीण ताजणे, भाष्कर मेडपल्लीवार, सदानंद तुरणकर, प्रभू रोहणकर आदी उपस्थित होते. धोबी समाज संघटनेने विटंबनेच्या घटनेचा निषेध केला आहे
गाडगेबाबांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:37 IST
वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेर येथे नुकतीच घडली.
गाडगेबाबांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचा निषेध
ठळक मुद्देआरोपींवर कारवाई करा : समाज संघटनेची मागणी