शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:33 IST

पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा गावात घडलेल्या घटनेबाबत स्तब्ध राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या आमदार व खासदारांचा आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनतर्फे निषेध करून पोस्टाद्वारे त्यांना बांगड्या पाठविण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा गावात घडलेल्या घटनेबाबत स्तब्ध राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या आमदार व खासदारांचा आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनतर्फे निषेध करून पोस्टाद्वारे त्यांना बांगड्या पाठविण्यात आल्या.आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने राज्य व केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा घटनेला दहशतवादी हल्ला घोषित करावा, सदर कृत्य घडविणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृतकाच्या कुटुंबास एक कोटी रूपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अनुसूचित जातीमधील प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडण्याकरिता निवडणूक प्रक्रियेत बदल करून बहुसदस्यीय निवडणूक क्षेत्राची निर्मिती करावी तसेच योग्यप्रकारे निवडणूक घ्यावी, अनुसूचित जातीच्या आंदोलनकर्त्यांवर सरकारकडून दबाव आणून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे दाखल करण्यात आलेले एफआयआर वापस घ्यावे, कोरेगाव भीमा प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे, राष्ट्रीय कार्यवाह प्रितम साखरे, विदर्भ कार्यवाह कबीर निकुरे, विदर्भ उपाध्यक्ष नरेश सिंहगडे, महिला आघाडीच्या महासचिव सुनिता राऊत, विलास साखरे, जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम, रूपेश सोनटक्के, अरूण शेंडे, हेमंत मेश्राम, कैवारदास रायपुरे, भाविक रामटेके, विश्रांती सिंहगडे, प्रफुल्ल भैसारे, सुनिता बांबोळे, नरेश रायपुरे, देवदत्त बांबोळे, मिलिंद भानारकर, अजय उंदीरवाडे, सोहन रामटेके व शेकडो कार्यकर्त्यांनी केली आहे.