शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवेमुळे जिल्हा बँकेची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:10 IST

जिल्हा बँकेच्या दुर्गम भागात शाखा सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे कर्तव्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे लोकांना बँकींग सेवा मिळत आहे.

ठळक मुद्देसचिन ओंबासे यांचे गौरवोद्गार : उत्कृष्ट शाखांना पुरस्कार प्रदान

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा बँकेच्या दुर्गम भागात शाखा सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे कर्तव्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे लोकांना बँकींग सेवा मिळत आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेची प्रगती सुरू आहे, असे गौरवोद्गार सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी काढले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात बँकांच्या शाखांना उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही घेण्यात आला. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक प्राचार्य खुशाल वाघरे, डॉ. बळवंत लाकडे, संचालिका शशिकला देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली, आरमोरी येथील शाखांना उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुर्गम भागातून तळोधी शाखा प्रथम, कुनघाडा द्वितीय व मुलचेरा येथील शाखेला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. रंगय्यापल्ली, पोटेगाव व कोटगूल येथील बँक शाखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार तर आभार मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी मानले.