शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 22:42 IST

अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील मंडळ कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यांची छाननी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता करण्यात येईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली / अहेरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली जाणार असून, सविस्तर कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील मंडळ कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यांची छाननी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता करण्यात येईल. वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी ७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.प्रत्यक्ष मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७:३० वाजतापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर मतमोजणी मंगळवार, दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे. अहेरी तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक होणार असलेल्या ३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. 

सुविधा केंद्रात ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा

-    संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि घोषणापत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरच भरणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी महाऑनलाइन सुविधा केंद्रात नामनिर्देशपत्र ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यात उमेदवारांनी स्वत:ची नोंदणी करून घ्यावी व नामनिर्देशनपत्र, घोषणापत्राची माहिती भरून त्याचे प्रिंट आऊट काढावे. त्यावर स्वाक्षरी/अंगठा करून निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्याकडे दाखल करावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

घोषणापत्रात सांगावी लागणार पार्श्वभूमी-    उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी मालमत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे. तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, राखीव जागेसाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती) आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

सदस्यांसाठी ५० हजार, तर सरपंचासाठी १.७५ लाखाची कमाल मर्यादा

ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ७ ते ९ सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये २५ हजार रुपये, ११ ते १३  सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार रुपये, तर १५ ते १७ सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींत ५० हजार रुपये एवढी खर्चाची मर्यादा राहणार आहे. 

सरपंचपदाच्या उमेदवाराला करावयाच्या खर्चाच्या मर्यादेतही सुधारणा करण्यात आली. त्यानुसार ७ ते ९ सदस्य संख्येच्या गावात ५० हजार रुपये, ११ ते १३  सदस्य संख्या असल्यास  १ लाख रुपये आणि १५ ते १७ सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १ लाख ७५ हजार रुपये एवढी खर्चाची मर्यादा राहणार आहे. 

नामनिर्देशनपत्रासोबत अनुसूचित जाती किंवा अनु. जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव जागेसाठी १०० रुपये, तर सर्वसाधारण जागेसाठी ५०० रुपये एवढी अनामत रक्कम रोखीने भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट  असणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक