शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठासमोर प्राध्यापकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:12 IST

युजीसी व केंद्र शासनाने मान्य केलेला सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जसाच्यातसा लागू करावा, या मागणीसाठी एमफुक्टो व घटक संघटना नुटाच्या वतीने प्राध्यापकांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ७० प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर कुलगुरूमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : वेतन आयोग जसाच्या तसा लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : युजीसी व केंद्र शासनाने मान्य केलेला सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जसाच्यातसा लागू करावा, या मागणीसाठी एमफुक्टो व घटक संघटना नुटाच्या वतीने प्राध्यापकांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ७० प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर कुलगुरूमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.युजीसीने व केंद्र शासनाने मान्य केलेल्या वेतन आयोगात महाराष्टÑ शासनाने प्राध्यापकांवर अन्याय होईल, अशी मोठी दुरूस्ती करून ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यानेही समाधान झाले नाही, म्हणून १० मे रोजी पुन्हा शासन निर्णय निर्गमित केला. या नवीन शासन निर्णयात एमफील, पीएचडीच्या वेतनवाढ नाकारण्यात आल्या आहेत. आरसी/ओसी पूर्ण करण्याची वाढीव मुदत नाकारली आहे. युजीसीने मान्यता दिलेले उपप्राचार्य पद नाकारले आहे. पदोन्नती करताना निर्धारीत दिनांकाऐवजी मुलाखतीचा दिवस ग्राह्य मानण्याची चुकीची पध्दत लागू केली जाणार आहे. अर्धवेळ प्राध्यापकांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रजेच्या समान परिनियमात ढवळाढवळ करण्यात आली आहे. या सर्व बाबी प्राध्यापकांवर अन्याय करणारे आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जून रोजी विद्यापीठासमोर प्राध्यापकांनी निदर्शने दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविले. कुलगुरूंना निवेदन देण्यापूर्वी प्रा. डॉ. पुरूषोत्तम बोरकर व प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी प्राध्यापकांवर कसा अन्याय होत आहे, हे सविस्तर स्पष्ट करून दाखविले. निवेदन देतेवेळी प्रा.डॉ. पुरूषोत्तम बोरकर, प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, प्रा.डॉ. प्रकाश शेंडे, प्रा. डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा.डॉ. हितेंद्र धोटे हजर होते. आंदोलनात प्रा.डॉ. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. किशोर हजारे, प्रा. खोपे, प्रा. मुंगमोडे, प्रा. निहार बोदेले, प्रा. रमेश धोटे, प्रा. डॉ. बाळू कांगरे आदी हजर होते.२४ ला पुणे येथे आंदोलनप्राध्यापकांच्या मागण्या मान्य न झाल्यास २४ जून रोजी पुणे येथील संचालक कार्यालयासमोर १ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई व २२ जुलै रोजी नवीदिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नुटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जे.पी. देशमुख, सचिव प्रा.डॉ. राजेंद्र घोनमोडे, डॉ. साळुंखे, डॉ. बाळू कोंगरे यांनी केले आहे.