शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, संपर्कप्रमुख विलास कोडापे, जिल्हा प्रमुख रियाज शेख, विधानसभा प्रमुख अरुण दुर्वे, विधानसभा संघटक बिरजू सिडाम, उपतालुका प्रमुख प्रफुल येरणे, तालुका प्रमख चंदू बेजलवार, ग्रामीण तालुका प्रमुख खुशाल मडावी यांनी भामरागड येथे पाेहचून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान भामरागड येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोषभाऊ बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सलीम शेख, आसीफसुफी, अनंत बिस्वास, प्रदीप करमाकार, सुरेश कोडापे, मनोज मंडल, परितोष राय आदींनी समस्या मांडल्या.
पर्लकोट नदीवरील पूल निर्माण कार्य सुरू आहे. यामध्ये भामरागड येथील व्यापाऱ्यांची काही घरे व दुकानलाईन तोडावी लागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे २८ जूनपासून भामरागड व्यापारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पोतदार यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याशी बाेलून दोन आठवड्यात तुमच्या समस्या सोडविणार, असे आश्वासन दिले. नुकसान भरपाई व सर्व दुकानांसाठी जागा देण्याची मागणी करू, सध्या आंदाेलन करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहाेत. जर न्याय मिळाला नाही तर तुमच्या आंदाेलनात आम्ही सहभागी हाेऊ, असेही पोतदार यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.
===Photopath===
260621\160220210625_154644.jpg
===Caption===
पदाधिकाऱ्यांना व्यापारी शिष्टमंडळाने निवेदन देताना