शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळांची होरपळ थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ५ तालुक्यांचा भार असतो. त्या तुलनेत येथे वैद्यकीय सोयीसुविधांची नेहमीच कमतरता भासते. १०८ क्रमांकावर बोलविली जाणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेसह भौतिक सुविधांचीही कमतरता असते.

ठळक मुद्देइन्व्हर्टरची व्यवस्था : जि.प.अध्यक्षांच्या आकस्मिक भेटीनंतर सुरू झाली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : परिसरातील पाच तालुक्यांचे रुग्ण सांभाळणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळ आणि बाळंतिणीला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अंधारात आणि गर्मीत होरपळत राहून मोठा त्रास सहन करावा लागत होता. तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली असताना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबत सूचना करताच रुग्णालय प्रशासनाने बाळ-बाळंतिणीला ठेवल्या जाणाºया कक्षातील वीज पुरवठा इन्व्हर्टरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ५ तालुक्यांचा भार असतो. त्या तुलनेत येथे वैद्यकीय सोयीसुविधांची नेहमीच कमतरता भासते. १०८ क्रमांकावर बोलविली जाणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेसह भौतिक सुविधांचीही कमतरता असते.ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांचे नातेवाईक अहेरीत नसल्याने त्यांना फक्त शासनामार्फत रुग्णालयात मिळणाºया सुविधांवरच अवलंबून राहावे लागते. दरवर्षी येथे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे पेशंट व नातेवाईकांना बाहेर जाऊन सोय करून घ्यावी लागते.अशा विविध गैरसोयींबाबत तक्रारी वाढल्याने जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तेथील अव्यवस्था त्यांना दिसली. विशेष म्हणजे त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झालेला असताना वैद्यकीय कर्मचारी इन्व्हर्टवरर चालणाºया विद्युत उपकरणांच्या प्रकाशात आणि पंख्याच्या हवेत बसलेले तर ओली बाळंतीण आणि तिचे नवजात बाळ अंधारात व गर्मीत आक्रोश करत असल्याचे आढळले. ही बाब खटकणारी असल्यामुळे कंकडालवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून योग्य ती दुरूस्ती करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला केली.त्याची दखल घेत या उपजिल्हा रुग्णालयात नवीन अतिरिक्त लाईन फिटिंग केली जात आहे. आता अत्यावश्यक असलेल्या सर्वच वॉर्डात इन्व्हर्टरचे कनेक्शन देणे सुरू असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल