कुरूड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रशाला गेडाम, उपसरपंच क्षितिज उके व सदस्यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सरपंच प्रशाला गेडाम यांनी कुरूडच्या विकासासंबंधी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका तसेच कुरूडसाठी प्रवेशद्वार व विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. खरिपातील धान विक्रीचा बाेनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. यावर मंत्र्यांनी लवकरात लवकर वरील मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपसरपंच क्षितिज उके, माजी उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम, ग्रामविकास अधिकारी संजय चलाख, शंकर पारधी, विलास पिलारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुलाराम लाकडे, नंदू चावला, रमेश ठाकरे, विलास गोटेफोडे, विजय पारधी, प्रल्हाद मेश्राम, नारायण खापरे, अनिल मिसार, विजय कुंभलवार, शुभम मेश्राम, विकास उरकुडे, गुड्डू राऊत, प्रफुल्ल आठवले, संभा शिवणकर व गावातील नागरिक हजर होते.
काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमाेर मांडल्या कुरूडच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST