शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीची चौकशी संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:45 IST

आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देजोगीसाखरातील घटना : नऊ दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नहरातील सागाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एक झाड विनापरवानगीने तोडले म्हणून वनविभागाने ते झाड जप्त केले व पीआर फाडला. त्यानंतर संबंधित शेतकरी, ठेकेदार, दिवानजी यांचे बयान वनविभागाने नोंदविले. जी सागाची झाडे तोडली गेली, ती झाडे आपल्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकºयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे इटियाडोह प्रकल्पाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार ती नहरातील झाडे आहेत. नेमकी ही झाडे कुणाच्या मालकीची आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलीस संयुक्तरित्या चौकशी करणार असल्याची माहिती आहे.नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीत विलंब करीत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.शिवसेनेचा इशारा धुडकावलाआरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहरावरील व शेतातून आंबा, साग आदी झाडांची अवैधपणे तोड करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात १४ फेब्रुवारी उलटली तरी ना गुन्हा दाखल झाला, ना कोणते आंदोलन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे.