शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल कव्हरेजची समस्या सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अंकिसा परिसरातील बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनासाठी अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. यातच मोबाईल क्रांतीने इंटरनेटवर विविध कामे करणे सोयीचे झाल्याने इंटरनेसुद्धा अत्यावश्यक झाले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात भ्रमणध्वनी कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधने व ऑनलाईन कामे करणे डोकेदुखी ठरत आहे. मात्र ही सेवा सुधारण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आहे.सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.तालुक्यात एकूण सहा टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.खासगी कंपन्यांना परवानगी द्यावीसिरोंचा तालुक्यात बीएसएनएलच्या नेटवर्कचे जाळे पसरले आहे. याचा वापर बहुतांश ग्राहक करीत आहेत. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी तालुक्यात जिओ कंपनीच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. परंतु वन विभाग व इतर शासकीय विभागाकडून परवानगी नाकारल्याने ऐनवेळी टॉवर सुरू झाले नाही. सध्या हे टॉवर शोभेची वस्तू ठरत आहे. तेलंगणा राज्याकडून कनेक्शन घेण्याचा प्रयत्नसुद्धा या कंपनीने केला होता. परंतु तेलंगणा सरकारनेसुद्धा याबाबतची परवानगी नाकारली. परिणामी ग्राहकांना खासगी कंपनीची सेवा मिळाली नाही. तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट सेवेची झालेली दुरवस्था पाहता खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुका सचिव रमेश चिंता यांनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल