शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:55 IST

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शनही केले.

ठळक मुद्देकृषी कल्याण अभियानाचा समारोप : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची दिली माहिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शनही केले.आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत १ जून ते ३१ जुलै या कालावधीत कृषी कल्याण अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर या गावी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाला सरपंच तपन सरकार, पंचायत समिती उपसभापती बिश्वास, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.संगीता निरगुडकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.बोथीकर, डॉ.ताथोड, डॉ.कदम, तालुका कृषी अधिकारी राजपूत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदीरवाडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, पीक कर्ज योजना, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स व्यवसाय, जीवन सुरक्षा योजना, ग्राम स्वराज्य अभियान या विषयांवर शेतकºयांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषीविषयक माहिती असलेली दैनंदिनी पुस्तक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्यातील तांत्रिक माहितीचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे सूचित केले. शेतकऱ्यांना फळरोपे, मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला वसंतपूर परिसरातील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्याचा सहावा क्रमांककृषी कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या आधारे गडचिरोली जिल्ह्याचा अखिल भारतीय स्तरावर सहावा क्रमांक आहे. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याने चवथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत उर्वरित लक्षांक पूर्ती करून पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी कल्याण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यापैकी सद्य:स्थितीत ९९ टक्के मृद आरोग्य पत्रिका वितरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. तसेच फळ रोपांचे वाटप १०२ टक्के, मिनीकिट बियाणे वाटप ११३ टक्के, नाडेप १२ टक्के, कृत्रिम रेतन १५ टक्के, लसीकरण ९७ टक्के एवढे उद्दिष्ट गाठले आहे.