शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतीत खासगी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:54 IST

सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे.

ठळक मुद्देछताचे प्लास्टर कोसळले : थोडक्यात बचावले विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे.कोत्तागुडम येथील परिवर्तन इमारत ही शासकीय इमारत समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यासाठी बांधण्यात आली. मात्र ही इमारत न.प. प्रशासनाने इंग्लिश मिडीअम स्कूल चालविण्यासाठी दिली आहे. या ठिकाणी गायत्री इंग्लिश मिडीअम स्कूल चालविल्या जाते. या ठिकाणी लहान बालके बसत असल्याने इमारतीची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. परिवर्तन इमारत १२ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. या इमारतीची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे प्लास्टर स्लॅबपासून वेगळे होऊन खाली कोसळत आहे. प्लास्टरचा एक तुकडा मंगळवारी पृथ्वी बेजनवार या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे सदर विद्यार्थी जखमी झाला. याबाबत पालक अनिता शामराव बेजनवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या शाळेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच ज्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शासकीय इमारत खासगी शाळेसाठी दिली त्यांच्यावर सुध्दा कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलगा जखमी झाल्यानंतर संबंधित पालकाने पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केली. त्यानंतर सदर खासगी शाळा अवैधपणे परिवर्तन भवनात चालविली जात असल्याचे उघड झाले. पालकाच्या तक्रारीनंतर प्रशासन संबंधित शाळेवर कोणती कारवाई करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.या शाळेला सहावीपासून वर्ग चालविण्याची परवानगी असताना पहिलीपासून वर्ग कसे घेतले जात आहे याबाबत प्रश्नचिन्ह उभे आहे.सुविधा आवश्यकप्राथमिक पूर्व शिक्षणाबाबत शासनाने कोणतेही धोरण आखले नाही. त्यामुळे कोणतीही परवानगी न घेता, प्राथमिक पूर्व शिक्षण देणाऱ्या शाळा गल्लोगल्ली उघडण्यात आल्या आहेत. इंग्रजी माध्यमाचा बोर्ड बघून पालक सुध्दा आकर्षित होत आहे. संबंधित शाळेत आवश्यक त्या सोयीसुविधा नसतानाही शिक्षण विभाग सुध्दा काहीच करू शकत नाही. अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.