जि. प. उपाध्यक्ष उपस्थित : गडचिरोली तालुक्याचा कार्यक्रमगडचिरोली : जिल्हास्तरीय प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानाचा शुभारंभ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली येथे गुरूवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. यावेळी पं. स. सदस्य अनिता मडावी, तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील मडावी, कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. महेश गौरी, बोदलीचे उपसरपंच पिपरे, वैैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, डॉ. बोनगुलवार, डॉ. गजानन बुरांडे, सुप्रिया महालदार, म्हशाखेत्री, कुळमेथे उपस्थित होते. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानांतर्गत गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या तसेच पूरक आहार, संस्थात्मक प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेऊन माता व बालमृत्यू टाळावा, असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केले. दरम्यान डॉ. कमलेश भंडारी, डॉ. सुनील मडावी यांनीही विविध आजारांवर मार्गदर्शन केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून महिलांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन हरिदास कोटरंगे तर आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाभाळे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानाचा बोदलीत शुभारंभ
By admin | Updated: June 10, 2016 01:34 IST