शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

By admin | Updated: September 22, 2016 02:23 IST

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली न काढल्याच्या कारणावरून धानोरा पंचायत समितीअंतर्गत

धानोरात आंदोलन : प्रशासनाच्या विरोधात तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्याधानोरा : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली न काढल्याच्या कारणावरून धानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर बुधवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. धानोरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या धोरणांमुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली निघाल्या नाहीत. शिक्षकांचे वेतन उशिरा करणे, सेवा पुस्तक अद्यावत न करणे, रजा प्रकरणे व नियमिततेच्या प्रस्तावात त्रूटी करणे, थकबाकी वेतन प्रकरणे आदी प्रकरणांवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची वारंवार गळचेपी केली जात आहे, असा आरोप करीत शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले. यापूर्वीही शिक्षक संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला वारंवार निवेदने सादर करण्यात आली. परंतु शिक्षकांच्या निवेदनाची दखल कार्यालयाने घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निकाली निघणार नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगीत करणार नाही, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. साखळी उपोषणाला डंबाजी पेंदाम, सुनील पनकंटीवार, आशिष धात्रक, प्रदीप उईके, दीपक भैसारे आदी शिक्षक बसले आहेत. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना, अप्रशिक्षित शिक्षक कृती समिती व शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)